चांदखेड : विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा व त्यांना गणित, भौतिक शास्त्र व रसायनशास्त्र विषयातील संकल्पना समजाव्या म्हणून केंद्र शासनाच्या वतीने चांदखेड येथील न्यू इंग्लिश स्कूल जे. एस. पी. एम. संस्थेच्या राजर्षी शाहू इंजिनिअरिंग महाविद्यालयच्या वतीने तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आले. यामध्ये १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विविध प्रयोग व शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना समजावून सांगितल्या. ७ ते ९ फेब्रुवारी तीन दिवस प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस जी कंदाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक आजिनाथ ओगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षणाचे समन्वयक प्रा. प्रवीण घटे व प्रा. जाधवसर उपस्थित होते.
भारतीय विद्या भवन मुक्तांगण एक्सप्लोरेटरी सायन्स सेंटरच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका व उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी, रूपा साने, नेहा धोपटे, ऋतुजा चिकाटे, जयश्री राणे, तेजस चिंबाळकर व भाग्यश्री मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अध्यापन केले. विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भूगोल आदी संकल्पना प्रयोगातून स्पष्ट करून सांगितल्या. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी जेष्ठ शिक्षक एस. ए. पवार व विज्ञान शिक्षिका सौ. पवार व्ही. बी. यांनी सहकार्य केले.




