चिंचवड: चिंचवड मोहननगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय ऊत्साहात संपन्न झाली. शिवजयंतीच्या निमित्ताने मोहननगर सार्वजनिक शिवजयंती मोहोत्सव कमिटीच्या वतीने एक गाव एक शिवजयंती या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे पुजण करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचारी व मोहननगर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जगद्गुरु तुकोबाराय यांचे गाथा वाटप करून त्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, मारुती भापकर, भाजप अध्यक्ष गणेश लंगोटे, व्यापारी असोसिएशनचे निलेश लुंकङ, पोलीस उपनिरीक्षक अतुल शेटे, अमोल चौगुले इत्यादी पोलिस अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल धोंङीबा राऊत ,संदीप बामणे, राहुल ऊर्फ पिंटू दातीर पाटील, सौरभ जगताप ,महादेव नेर्लेकर, संजूबाबा वाघमोडे,पिंपरी विधानसभा मनसे अध्यक्ष दत्ता देवतरासे, संदीप अलंकार, बाळासाहेब भोसले,महेश पंङीत,दिगंबर बालुरे,आप्पा मोरे, प्रथमेश पाटील आयान शेख, रोहित नायकू, निलेश कुदळे, ऋषिकेश पवार, ऋग्वेद बामणे , श्री पवळे , निहाल खांडेकर, सुमित खोकर, प्रथमेश कुंभार , आकाश दुबे , सौरभ शुक्ला , रुपराव कोल्हटकर, संतोष खोकर इत्यादींनी परीश्रम घेतले.




