पिंपरी : महाराष्ट्र राज्यात एचएससी म्हणजेच इयत्ता १२ वीच्या अंतिम परीक्षा आज, २१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा स्विकृत नगरसेवक सुनिल कदम व सामाजिक कार्यकर्त्या सौ प्राची सुनिल कदम यांच्या वतीने बारावीच्या विद्यार्थीचे फुल व पेन देवून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राचार्य बि ङी मालुञे , के ङी गायकर , जी रा कर्ङीले , पर्यवेक्षीका सिंधू मोरे, सि. एस. पवार आदी शिक्षक उपस्थित होते.
आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र HSC 2024 परीक्षा १९ मार्चपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र १२वी बोर्ड परीक्षा २०२४ च्या शेवटच्या दिवशी विद्यार्थी समाजशास्त्राचा पेपर लिहिणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी रामकृष्ण मोरे कॅालेज, आकुर्डी येथे स्विकृत नगरसेवक सुनिल कदम मित्र परिवार व सामाजिक कार्यकर्त्या सौ प्राची सुनिल कदम याच्या तर्फ विद्यार्थ्यांना पेन व फुल देवून शुभेच्छा देण्यात आले.




