मराठा आरक्षणासाठी अल्पावधीत प्रकाश हातात आलेले मनोज जरांगेंवर गंभीर आरोप करणाऱ्या हभप अजय बारस्कर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
बच्चू कडू यांच्यासह बारस्कर हे जरांगे यांच्या उपोषणावेळी चर्चेत सहभागी झाले होते. त्यांनी या आंदोलनाला पाठिंबाही दिला होता. त्यामुळं जरांगेंच्या आंदोलनातील एक सदस्य म्हणून त्यांची ओळख होती.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेवर मोठे आरोप केले आहेत. मनोज जरांगे रोज पलटी मारतात, खोटं बोलतात, असा गंभीर स्वरूपाचा आरोप बारसकर यांनी केला आहे.
यावेळी बोलताना बारसकर म्हणाले, जरांगे पाटील हेकेखोर आहेत. त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केलं आहे. जरांगे लोकांची फसवणूक करत आहेत. जरांगे यांना बोलताना भान राहत नाही असंही असंही बारसकर यांनी पुढे म्हटलं आहे.



