- रेल्वे पायाभूत सुविधांमुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल – शंकर जगताप
पिंपरी : अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेतून रेल्वे स्टेशन आधुनिक सुविधांनी युक्त होतील आणि प्रवाशांना चांगल्या प्रवासाचा अनुभव मिळेल. या योजनेमुळे देशाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदीच्या हस्ते देशभरातील 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, 1500 रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे भूमिपूजन तसेच उद्घाटन करण्यात आले. या योजनेच्या अंतर्गत पुणे मंडलाच्या चिंचवड रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. एकू 20.44 कोटींच्या पुर्नविकासाच्या कामाचा पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन झाले. त्यावेळी शहरवासियांना शुभेच्छा देतांना चिंचवड रेल्वे स्थानक परिसरात आयोजित कार्यक्रमात शंकर जगताप बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, पुणे मंडलाच्या प्रबंधक इंदू दुबे, प्रदेश निमंत्रित सदस्य महेश कुलकर्णी, प्रवक्ते राजू दुर्गे, भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके, अजय पाताडे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, माजी उपमहापौर केशव घोळवे, नगरसेवक राजेंद्र गावडे, नगरसेविका मीनाताई कुलकर्णी, आरतीताई चोंधे, सविता खुळे, बेटी बचाव बेटी पढाओ संयोजिका प्रीती कामतिकर, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, निलेश अष्टेकर, संतोष तापकीर, योगेश चिंचवडे, दीपक भोंडवे, सिद्धेश्वर बारणे, शेखर चिंचवडे, देवदत्त लांडे, सांस्कृतिक आघाडी संयोजक विजय भिसे, मधुकर बच्चे, राजश्री जायभाय, प्रकाश जवळकर, निता कुशारे, सचिन काळभोर, बाळासाहेब भूंबे, रवींद्र नांदुरकर, पल्लवी मारकड, पल्लवी पाठक, पल्लवी कोल्हापुरे, सज्जाद तांबोळी, मनिषा शिंदे आदी पदाधिकारी तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विकसित भारत आणि विकसित रेल्वे या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सदर देशभरात २ हजारहून अधिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे होते. यास ४० लाखाहून अधिक नागरिकांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.




