राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर मराठवाड्यात आता काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच येत्या २ दिवसांत ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी एका नेत्याने काँग्रेसला राम राम केल्याने लातूर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.



