लोणावळा : लोकसभा निवडणुकीचे वार वाहत असताना सर्व पक्ष आपापल्या परिने आपल्या पक्षाचं काम करताना दिसत आहे. त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे उद्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असणार आहं. पक्ष फुटला. त्यानंतर पक्ष आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला गेलं. त्यानंतर येणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे.
उद्धव ठाकरे यांची मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, खोपोली, उरण या तीन ठिकाणी उद्या सभा घेणार आहे. दुपारी ३ वाजता हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहेत. दुपारी ४ वाजता पनवेल येथे जनसंवाद सभा घेणार आहेत. ५:३० वाजता खोपोली तिथे सतीश झाकोटिया मैदान इथे सभा घेतली जाणार आहे.संध्याकाळी ७:३० वाजता नवीन सेवा मैदान, उरण या ठिकाणी सभा होणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून आलेले माजी महापौर संजोग वाघेरे त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. यामुळे आता राज्यात अनेक ठिकाणी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे सभा घेण्याची शक्यता आहे




