पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) काल सायंकाळी नाशिक फाटा उड्डाणपूल ते कोकणे चौकापर्यंतचे अनधिकृत बांधकाम पाडले.
अधिक माहितीनुसार, नाशिक फाटा उड्डाणपूल ते कोकणे चौक दरम्यान ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या परिसरात अनधिकृत शेड व बांधकामांवर कारवाई करण्यात आली. सुमारे ४५ हजार चौरस फूट क्षेत्रफळ साफ करण्यात आले.
साई चौक जगताप डेअरी ते डांगे चौक या रस्त्यालगत कारवाई करण्यात येणार आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
उपायुक्त मनोज लोणकर, क्षेत्राधिकारी अंकुश जाधव, अमित पंडित, अजिंक्य येळे, सुचिता पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली चार वॉर्ड कार्यालयातील चार पथकांनी ही कारवाई केली असून त्यात ४ उपअभियंता, ५ कनिष्ठ अभियंता, ४ बीट निरीक्षक, १ पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. अतिक्रमण विभागातील 5 पोलीस, 3 महिला पोलीस 80 एमएसएफ जवान, वाकड पोलीस स्टेशनचे 1 पोलीस कर्मचारी, 4 जेसीबी, 1 कटर व 20 मजूर उपस्थित होते.




