पिंपरी : बुधवार, ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या पुणे मेट्रो मार्गाचे अक्षरशः उद्घाटन होणार आहे. पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या विस्ताराचे भूमिपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.
हर्डीकर म्हणाले, रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गावर चार स्थानके असतील. ते म्हणाले, “तीन 6 मार्चपासूनच कार्यान्वित होतील तर चौथा, येरवडा पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल,” ते म्हणाले.
पिंपरी पासून निगडी पर्यंत मेट्रोमार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी शहरवासियांनी अनेकदा आंदोलने केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासाठी पाठपुरावा केला. त्याच सोबत स्थानिक खासदार, आमदार, वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक व नेत्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
पुणे महामेट्रो कडून मेट्रोच्या दोन मार्गिकांवर काम सध्या सुरु आहे. त्यातील काही भाग दोन टप्प्यांत प्रवासी वाहतुकीसाठी सुरु करण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांना जोडणारे महा मेट्रोचा मार्ग स्वारगेट पासून कात्रज पर्यंत व पिंपरी पासून निगडी पर्यंत वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री काळात अजित पवार यांनी पुढाकार घेतला. आता त्या नव्या पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाच्या कामाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
स्वारगेट ते पिंपरी मेट्रो पिंपरी पर्यंत आली मात्र ती निगडी पर्यंत सुरु होणे आवश्यक असल्याची मागणी सातत्याने शहरातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार महामेट्रो कडून या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्याला राज्य शासनाची परवानगी मिळाली आणि हा अहवाल केंद्राकडे प्रलंबित होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी या मार्गाला गती मिळून मेट्रो महामार्ग निगडी पर्यंत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
- पिंपरी-चिंचवडकरांचे स्वप्न पूर्ण…..
पिंपरी स्थानकाचा एम्पायर इस्टेट पुलापर्यंत मेट्रो मार्गाचे काम झाले आहे. मेट्रो यार्ड तेथून पुढे मार्ग विस्तारीकरणाचे नियोजन आहे. पिंपरी ते निगडी दरम्यान चिंचवड स्टेशन (महावीर चौक व अहिंसा चौक दरम्यान), आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडी (टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक दरम्यान) अशी तीन मेट्रो स्थानके होणार आहेत. या कामासाठी 910 कोटी 18 लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. बुधवारी उद्घाटन झाल्यानंतर हे काम पुढील सव्वा तीन वर्षात पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता यानंतर पिंपरी चिंचवड मेट्रो मार्गाचा विस्तार होणे अपेक्षित आहे. निगडी भक्ती शक्तींपासून किवळे, मुकाई चौक आणि वाकड चौकापर्यंत जाण्यासाठी नियोजन सुरू आहे. तसेच हिंजवडी ते नाशिक फाटा मार्गे चाकण पर्यंत मेट्रो विस्तारित आहे. या नवीन दोन मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत मिळणार आहे.




