पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने ‘रानजाई महोत्सव’ व २७ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला, बागा प्रदर्शन व स्पर्धा ’ दिनांक १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत नियोजित महापौर निवास, सेक्टर नं २७ संत तुकाराम उद्यान शेजारी, निगडी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आले होते.
यामधील विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये लक्ष्मी फ्लॉवर ऍन्ड डेकोरेशन, भारत भुजबळ यांना महापौर चषक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच हिंदुस्तान पेट्रेलियम, निगडी यांना आयुक्त चषक देऊन सन्मानित करण्यात आले. आणि सी. आय. ई. इंडिया स्टँपिग डिव्हिजनला फुलांचा राजा म्हणून ढाल देऊन सन्मानित करण्यात आले तसेच जयवंतराव टिळक, गुलाबपुष्प उद्यान यांना फुलांची रानी चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सुर्यकांत मुतियान, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




