- अजित गव्हाणे आणि पंकज भालेकर यांच्या पाठपुराव्याला यश
- बायोडाव्हर्सिटी प्रकल्पाबरोबर अत्याधुनिक उद्यान, खेळाचे मैदान, बैलगाडा घाटाचे नुतनीकरण, कुस्ती आखाडा सुविधाही मिळणार
पिंपरी : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या धाडसी निर्णयामुळे तळवडे येथे उभारले जाणार बायोडाव्हर्सिटी पार्क साकारत आहे. स्थानिक नगरसेवक पंकज भालेकर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या पाठपुराव्याने तळवडे येथे “बायोडाव्हर्सिटी पार्क” उभारले जाणार आहे. महापालिका आयुक्त तथा शेखर सिंह यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
तळवडे परिसरातील नागरीकांकरीता सदरचा महत्वपुर्ण प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे . यासाठी प्रकल्पाची निविदा लोकसभेच्या आचारसंहिंतेपुर्वी प्रसिद्ध करणेकरीता आयुक्त शेखर सिंह यांचेकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची निविदा वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी आदेश काढून गायरान जमीन महापालिकेस हस्तांतराची कार्यवाही केली. त्यामुळे या जमिनीत बायोडाव्हर्सिटी प्रकल्पाबरोबर स्थानिक नागरीकांना अत्याधुनिक उद्यान, खेळाचे मैदान, अस्तित्वातील बैलगाडा घाटाचे नुतनीकरण, कुस्ती आखाडा तसेच मुलभुत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
“बायोडाव्हर्सिटी पार्क” होण्याचा मार्ग मोकळा


१) उपमुख्यमंत्री तथा पालकमत्री अजितदादा पवार यांच्या विशेष सहकार्याने तसेच स्थानिक नगरसेवक पंकज भालेकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे तळवडे येथील मागील १० वर्षे प्रलंबित असणारी ५९ एकर गायरान जागा महसुल विभागाने विनामोबदला पिंपरी चिंचवड मनपाच्या ताब्यात दिलेली आहे.
२) बायोडाव्हर्सिटी प्रकल्प उभारण्याकरीता १०० कोटीचा निधी लागणार आहे. त्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन तसेच मनपा निधी उभारणार असुन शासनाकडून निधी उपलब्ध होण्याकरीता अर्थमंत्री असणारे आजितदादा पवार प्रयत्नशिल आहेत.
३) पिंपरी चिंचवड शहराच्या परिसरात असलेली जैवविविधता टिकविणे यासह स्थानिक रहिवाशांचा या उपक्रमामध्ये सहभाग वाढविणे हा प्रकल्प आदर्शवत राहणार आहे.
४) तळवडे गावाचा संपुर्ण भाग रेडझोन मध्ये येत असल्यामुळे येथे अद्याप पर्यंत एकही आरक्षण विकसित करण्यात आलेले नव्हते.
५) रेड झोनच्या कार्यक्षेत्र मध्ये तळवडे गाव व परिसरातील नागरीकांकरीता मुलभुत सुविधा पुरविण्यात महापालिकेने नेहमी दुर्लक्षित ठेवले होते.
६) तळवडे ग्रामस्थ व परिसरातील स्थानिकांना राज्य शासनाने दिलेल्या गायरान जागेचा फायदा व्हावा याकरीता “बायोडाव्हर्सिटी प्रकल्प” राबविणेकरीता महापालिकेकडे पाठपुरावा करणेत आला आहे. या बायोडाव्हर्सिटी पार्क मध्ये स्थानिक नागरिकांचा विचार करुन कुस्ती आखाडा, अत्याधुनिक उद्यान, अस्तित्वातील बैलगाडा घाटाचे नुतनीकरण, मेडीटेशन हॉल, भव्य बहुउद्देशिय सभागृह (In Tensile roof), वॉकींग ट्रॅक, बहुउद्देशिय खेळाचे मैदान, टर्फचे मैदान, पोहण्याचा तलाव, सुसज्ज पार्कींग तसेच स्थानिक नागरीकांकरीता मुलभुत सुविधा उपलब्ध होणार आहेत. याकरीता मनपामार्फत संपुर्ण प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव मंजुर केला आहे.
७) या प्रकल्पाचा प्रभागासह शहरातील रहिवाशी यांना उपयोग होणेकरीता बायोडाव्हर्सिटी प्रकल्पा बरोबरच काही महत्वाच्या बाबी विकसित करणेत येणार आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरीक तसेच शहरातील रहिवाशांना एकाच ठिकाणी मनोरंजन / पर्यटनाकरीता स्थळ प्राप्त होणार आहे.
८) या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक मोठा “डीअर पार्क’ प्रोजेक्ट साकारला जाणार होता. याबाबत 2010 मध्ये तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांच्या पुढाकाराने याची आखणी करण्यात आली होती. मात्र यात सुधारणा करून देशातील सर्वांत मोठा बायोडायव्हर्सिटी पार्क उभारल्यास पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
———————————————–
तळवडे गायरानची ५९ एकर जागा मनपाच्या ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मार्फत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे सदरची जागा विनमोबदला मनपाच्या ताब्यात मिळाली आहे. सुरुवातीस या जागेवर डीयर पार्कचे नियोजन होते. परंतू वनविभागामार्फत अभिप्राय घेतला असता सदर ठिकाणी डियर पार्क उभारणे शक्य नसल्यामुळे त्या ठिकाणी बायोडाव्हर्सिटी प्रकल्पासह स्थानिक नागरीकांना अत्याधुनिक उद्यान, खेळाचे मैदान, अस्तित्वातील बैलगाडा घाटाचे नुतनीकरण, कुस्ती आखाडा इ. प्रकल्प उभारणेबाबत पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आयुक्तांना सुचना दिल्या होत्या. त्यामुळे तळवडे येथे रेडझोन निकषाचे कोणतेही उल्लंघन न करता सदरचा प्रकल्प उभारणे शक्य होत आहे. परिसरातील नागरीकांसाठी ही एक आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

पंकज दत्तात्रय भालेकर
मा. नगरसेवक तथा अध्यक्ष,
राष्ट्रवादी कॉंग्रेस, भोसरी विधानसभा




