पिंपरी : महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे “महासंघ मेडिकल्स” हे औषधांचे दुकान आज बुधवारपासून पुन्हा सुरु करण्यात आले आहे.
ही सेवा ना नफा-ना तोटा या तत्वावर यापूर्वी 8 फेब्रुवारी 2015 पासून सुरु करणेत आली होती. परंतु न्यायालयीन प्रक्रीयेमध्ये मागील काळात सेवा खंडीत होती. आता महासंघ मेडिकलची सेवा सर्वांसाठी अविरतपणे सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली.




