पिंपळे सौदागर : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रहाटणी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण दिनास दोन वर्ष पूर्ण झाले. १२ मार्च रोजी द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मा. नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
पंचधातूमधील हा अश्वारुढ पुतळा जिरेटोपपर्यंतची उंची 21 फूट आहे. तलवारीच्या टोकापर्यंतची उंची 28 फूट इतकी आहे. या पुतळ्याचे वजन 6 टन असून फक्त घोड्याच्या मागील दोन पायावर उभा असणारा पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भर टाकणारा आहे. या पुतळ्यास 12 मार्च रोजी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.
द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधत पुतळ्याच्या मागील बाजूस नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात विक्रमी ४२४ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला प्रशस्तीपत्रक, शिवाजी महाराज यांची प्रतिकृती व उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून १००० रुपयाचे कूपन देण्यात आले.




