मोशी: आज 20 मार्च जागतिक चिमणी डे म्हणून साजरा केला जातो. मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रेत्यांनी कलिंगड, फिडर, पाणी ठेवून चिऊताईस् शुभेच्छा देत चिमणी डे साजरा केला.
चिऊताई, चिऊताई दार उघड ! दार असं लावून, जगावरती कावून, किती वेळ डोळे मिटून आत बसशील ? आपलं मन आपणच खात बसशील ?. कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही कविता आजही प्रत्येकाच्या ओठी आहे. आता तुम्ही म्हणाल आज ही कविता का? तर त्याला कारणही तसंच आहे. आज जागतिक चिमणी दिन आहे. आज 20 मार्च ‘जागतिक चिमणी दिवस’ जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा आजचा दिवस. पहिला जागतिक चिमणी दिन २०१० मध्ये जगाच्या विविध भागात साजरा करण्यात आला.




