होळी म्हणजे रंग, उत्साह, आनंद, मज्जा… रंगांच्या या सणाची लहानथोर सर्वचजण आतुरतेने वाट पहात असतात. होलिका दहन झाल्यावर सर्वजण दुसऱ्या दिवशी आपले कुटुंबीय, मित्रांसोबत रंग खेळतात, एकमेकांना रंग लावतात, होळीच्या शुभेच्छा देतात. उत्तर भारतामध्ये तर हा सण विशेषत: मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. यंदा 24 मार्चला होळी पौर्णिमा झाल्यावर 25 मार्च रोजी रंग खेळण्यात येणार आहेत. या दिवशी पुरणपोळीसह अनेक पक्वान्नं देखील तयार केली जातात.
होळी हा रंगांचा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात आपल्या देशात साजरा केला जातो. होळी दिवशी लोक गाईच्या सेना पासून तयार केलेल्या गौर्या मोठ्या प्रमाणात वापरतात त्याचबरोबर लाकडी वापरले जाते. होळीचा सण तोंडावर आल्यामुळे जनावरांच्या शेणापासून गौर्या तयार करण्याच्या कामांना लगबग सुरू आहे तर अनेक शेतकरी वर्ग गौर्या तयार करून होळीची तयारीसाठी सज्ज झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आजही अनेक भागातील शेतकरी गाय म्हशीचे गोठे आहेत. त्यामधून निघणाऱ्या जनावरांच्या शेणापासून मोठ्या प्रमाणात गोवऱ्या तयार करण्याचे काम केले जाते. पिंपरी चिंचवड शहरा लगत असणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात गोवऱ्या तयार करतात. शहरात होळी दिवशी याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.




