पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे सूत्र अंतिम टप्प्यात असताना मावळ लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. भाजप कार्यकर्त्याकडून मावळ लोकसभेसाठी आग्रह कायम आहे तर भाजपमधील विद्यमान खासदारांच्या उमेदवारीला भाजप अनुकूलन नाही यामध्येच मावळ लोकसभेचा उमेदवार अद्याप जाहीर न केल्याने विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची धाकधूक कायम आहे.
पक्षहितासाठी विचार करून आढळराव यांच्या उमेदवारी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा विरोध मावळला आहे. यातच आज शिरूर लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी आपले समर्थक आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे यांच्यासह निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे खेड लोकसभेसाठी अजित पवार गटाकडून उमेदवार देण्याबाबतची अंतिम बोलणे आज संपतील अशी चर्चा आहे.
दुसरीकडे मावळ लोकसभेसाठी भाजपच्या केंद्रीय यंत्रणेद्वारे स्थानिक पदाधिकारी उमेदवार देण्यासाठी आग्रही आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पक्षाचे काही खासदारांनी मुंबई येथे निवासस्थानी भेट घेतली. यामध्ये खासदार सदाशिव मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह काही खासदार व इच्छुकांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली यामध्ये त्यांनी आपले व्यथा मांडल्या. तर भाजपच्या केंद्रीय यंत्रणेकडून व स्थानिक भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा कमळ चिन्ह वरती लढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या संघर्षात मावळ लोकसभेची उमेदवारी अद्याप जाहीर केली नाही त्यामुळे खासदार बारणे यांची धाकधूक वाढली आहे.




