कामशेत:- कामशेत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अनधिकृत बांधकाम म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम पाडले. पण या ठिकाणी आता अनधिकृत फ्लेक्स व अनधिकृत पार्किंग झाली आहे. व्यापारी या ठिकाणी वाहने पार्किंग अस्ताव्यस्त करत असल्यामुळे कामशेत अतिक्रमणाच्या वेळेच्या असल्याचे दिसून येते. यावरून ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभार समोर येत आहे.
या ठिकाणी वाहने कित्येक दिवस उभे असतात सदरील जागेवर गोरगरीब आपली पोट भरत होते. पण हे अतिक्रमण काढून सार्वजनिक बांधकाम विभागाने काय साध्य केले असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहे. याठिकाणी मोठे मोठे होर्डिंग लावली जात आहे. सदरील फ्लेक्स अनधिकृत असून यावर कुठली ही कार्यवाही होताना दिसत नाही.
उलट फ्लेक्समुळे चौकाला बकाल स्वरूप आले आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत आहे तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी या जागेवर अनधिकृत पार्किंग केली आहे. त्यामुळे अतिक्रमण काढून बांधकाम विभागाने काय साध्य केले असा प्रश्न नागरिक विचारत आहे. सदरील जागेवरील अनधिकृत फ्लेक्स कधी काढणार का? अनधिकृत वाहन तळावर कारवाई करणार का? दैनंदिन रोजगार कमावणाऱ्या लोकांच्या पोटावर लाथ मारली आता अतिक्रमणाच्या वेळेच्यातून परिसराला मुक्तता देणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहे.
चौकात मोठमोठे होर्डिंग लावून पुढारी मनमानी पद्धतीने फ्लेक्स बाजी करताना दिसत आहे. यावर कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतचा अंकुश नाही. कित्येक दिवस एकाच ठिकाणी वाहने पार्क केल्याने धूळ खात उभी आहेत. व्यापाऱ्यांना या ठिकाणी हक्काचे वाहनतळ मिळाले आहे. तरी सदरील जागेचा उपयोग योग्य करावा असं मागणी नागरिक करत आहे.




