पिंपरी : राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाचे गुराळ अद्याप सुरू आहे. आज शिवसेना पक्षाच्यावतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आठ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार घोषित करण्यात आले. यामध्ये मावळ लोकसभेसाठी पुन्हा खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून वाघेरे यांना उमेदवारी घोषित केलेली आहे. त्यामुळे आता मावळ लोकसभा मतदारसंघात दोन शिवसेनेत थेट लढत होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड व शिरूरच्या दोन उमेदवारांची घोषणा केली. लोकसभेसाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करताना त्यांनी मावळ लोकसभेत महायुतीचा धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार उभा राहील असे सांगितले होते.
महायुतीकडून प्रबळ दावेदार म्हणून पहिली पसंद श्रीरंग बारणे यांना होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे मावळ लोकसभेसाठी धनुष्यबान व मशाल यांच्यातच थेट लढत होणार आहे.




