मुंबई ; मागील काही दिवसापासून महायुतीचे घटक पक्षांचे उमेदवार जाहीर न झाल्यामुळे जागा वाटपाचे घोडे कुठे काढले आहे याबाबत अनेक चर्चांना होत आला होता भाजपने 22 लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दोन उमेदवार जाहीर केले आहेत मात्र राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एकही उमेदवार जाहीर न केल्यामुळे शांतता होती.

आज अखेर लोकसभेच्या उमेदवाराचा सस्पेन्स काही अंशी कमी झाला आहे. यामध्ये अनेक विद्यमान खासदारांना तिकीट देण्यात आले आहे. हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.
मतदार संघ
१ – मुंबई दक्षिण मध्य – श्री राहुल शेवाळे
२ – कोल्हापुर – श्री संजय मंडलीक
३ – शिर्डी (अजा) – श्री सदाशिव लोखंडे
४ – बुलढाणा – श्री प्रतापराव जाधव
५ – हिंगोली – श्री. हेमंत पाटील
६ – मावळ : श्रीरंग बारणे
७ – रामटेक (अजा) : श्री राजू पारवे
८ – हातकणंगले : धैर्यशील माने



