मंचर : आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाची बैठक मंचर येथे झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंचरचे आदर्श सरपंच पुरस्कार विजेते दत्ता गांजाळे यांनी निवडणूक लढवावी असा ठराव टाळ्यांचा कडकडाट करत एकमताने मंजूर करण्यात आला.
एक मराठा लाख मराठा अशा उत्स्फूर्त पणे घोषणा देण्यात आल्या यावेळी आखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे पाटील, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड सुनील बांगर, गणेश खानदेशे, वसंतराव बाणखेले , सरपंच दीपक पोखरकर, उपस्थित होते राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची नावे सकल मराठा समाजाच्या वतीने मागविण्यात आली आहेत.
त्यानुसार आंबेगाव तालुक्यातून गांजाळे यांच्या नावावर एकमताने शिक्का मोर्तब करण्यात आले. असे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड सुनील बांगर व सकल मराठा समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश लांडे पाटील यांनी सांगितले.
प्रा.सौरभ शिंदे, बाबाजी चासकर, , विजयराव पवार, दत्तात्रय खिलारी,अजय मुळूक, रोहित नाईकडे व दत्ता गांजाळेयांनी शिरूर लोकसभानिवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगितले .सर्व नावांवर अत्यंत शांततेने चर्चा करण्यात आली.



