पुणे : महादेव जानकर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार यांना आपल्या कोट्यातील परभणीची जागा दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत महादेव जानकर यांना परभणी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
परभणीमध्ये जानकर यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय बंडू जाधव यांच्याशी होणार आहे. आपल्या छोट्या पक्षाला सामावून घेतले आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले होते. मी महायुतीला दोन जागा मागितल्या होत्या त्यातील त्यांनी एक दिली आणि महाविकास आघाडीकडे मी तीन जागा मागत होतो, त्यापैकी एकही मिळाली नाही. त्यामुळे पन्नास टक्के भागीदारी दिल्याबद्दल आपण महायुतीचे आभारी असल्याचे महादेव जानकर म्हणाले.


