पिंपरी (प्रतिनिधी) नृसिंह चषक २०२४ या भव्य टेनिस बॉल फुलपिच क्रिकेट स्पर्धेत दिवडच्या माणुसकी वॉरियर्स संघाने बावधनच्या न्यू गोल्डन संघाचा १६ धावांनी पराभव करून नृसिंह चषक पटकावला. तसेच १ लाख ११ हजार रुपयांचे रोख पारितोषिकाचे मानकरी ठरले. ताथवडे ग्रामस्थ व जाणता राजा स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
माणुसकी वॉरियर्सने चार षटकात चार बळींच्या मोबदल्यात पिपंरी ५० धावांचा डोंगर उभा केला. ५१ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना न्यू गोल्डन संघाला सातत्याने मोठे फटके मारण्यात अपयश आले. तीन विकेटच्या मोबदल्यात ते केवळ ३४ धावाचं करू शकले. या सामन्यात तुफान फटके करून १८ चेंडूत ४० धावा कुटणाऱ्या सुमित राजिवडे ह्याला मॅन ऑफ द मॅच किताबाने गौरविण्यात आले. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड, मुळशी व मावळ तालुक्यातील तब्बल तीसहून अधिक संघ या सहभागी झाले होते. पंचक्रोशितील क्रिकेट शौकीनांनी मॅच पाहण्यासाठी गर्दी केली होती.
शिवसेना (उ.बा.ठा) युवासेनेचे शहराध्यक्ष चेतन पवार, उद्योजक महेंद्र पवार, जयहिंद बँकेचे संचालक राजेंद्र पवार, विजय दगडे, शरद पवार, अजिंक्य गावडे, अक्षय पवार, सागर पवार, संतोष कदम, राज वड्डे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण संपन्न झाले. २३ ते ३० मार्च दरम्यान सात दिवस ताथवडे, लोंढे वस्ती येथील डेअरी फार्मच्या भव्य मैदानात ह्या मॅचेस झाल्या. त्यासाठी लाईट व साउंड सिस्टमची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. युवा उद्योजक मयूर पवार व राहुल पवार यांनी या स्पर्धेचे भव्य आयोजन केले होते.




