नवी दिल्ली, दि. ३१ सहसा जगभररासा अनुभव येतो की सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोक राजकारणी लोक अथवा लोकप्रिय नेत्यांपासून दूर राहतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत असे नाही आणि सुशिक्षित मतदारांमध्ये त्यांचा पाठिंबा वाढत असल्याचे दिसते, असा आशय असलेला अहवाल आंतरराष्ट्रीय माध्यम समूह ‘द इकॉनॉमिस्ट’ ने प्रसिद्ध केला आहे. मोदींच्या या सर्वच स्तरांतील लोकप्रियतेमुळे त्यांच्या पक्षाला आगामी निवडणुकीत चांगले यश मिळण्याची शक्यताही ‘द इकॉनॉमिस्ट’ ने व्यक्त केली आहे.
‘भारतातील अभिजात वर्ग नरेंद्र मोदींना का समर्थन देतो?’ या शीर्षकाच्या लेखात, ‘द इकॉनॉमिस्ट’ने म्हटले आहे की, राजकारण, अर्थव्यवस्था आणि उच्चभ्रू लोकांकडून केले जात असलेले राजवटीचे कौतुक या विरोधाभासाच्या गोष्टी असतील कदाचित; पण भारतीय पंतप्रधान अनेकदा डोनाल्ड ट्रम्प सारख्या उजव्या विचारसरणीच्या लोकांप्रमाणे सर्वच स्तरांमध्ये लोकप्रियता टिकवून ठेवू शकतात. त्यामुळे अशा नेत्यांना किमान आणखी एक संधी सहजपणे मिळू शकते.
गॅलप सर्वेक्षणाचा हवाला
देत, द इकॉनामिस्टने असे म्हटले आहे की, मोदींनी आपली लोकप्रियता कायम राखली आहे. प्यू रिसर्चच्या सर्वेक्षणावरुन असे दिसून येते की प्राथमिक शालेय स्तराच्या पुढे शिक्षण नसलेल्या ६६ टक्के भारतीयांनी २०१७ मध्ये मोदींबद्दल ‘अत्यंत अनुकूल’ मत व्यक्त केले होते. परंतु त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या ८० टक्के लोकांनी मोदींनाच पसंती दिली. लोकनीतीच्या सर्वेक्षणानुसार असे ४२ टक्के भारतीय पदवीधरांनी मोदींच्या भाजपाला पाठिंबा दिला, तर शालेय स्तरावरील ३५ टक्के लोकांनी मोदींनाच पाठिंबा दिला




