
पिंपरी :- मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची उमेदवारी लवकर जाहीर झाल्यामुळे त्यांना मतदार संघात प्रचारासाठी अधिकच वेळ मिळाला आहे. वाघेरे यांनी दररोजच्या दिनक्रमात अधिकाधिक गावभेट दौऱ्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर शहरी भागात मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
ठिकठिकाणी वाघेरे पाटलांचे औक्षण करून स्वागत केले जात होते. “जय भवानी, जय शिवाजी” या घोषणांनी नागरिकांच्या गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. मतदारांकडून शुभेच्छांचा स्वीकार करीत संजोग वाघेरे पाटील मनापासून विचारपूस करताना दिसत आहेत. त्यांच्या याच मनमिळावू स्वभावामुळे लोकांच्यात त्यांचे आकर्षण वाढत आहे.
कडाक्याच्या उन्हाळा असूनही कार्यकर्त्यांच्या भेटीमुळे त्याच्या उत्साहात भरच पडत आहे. वाघेरे पाटील यांना मावळ लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खासदार म्हणून पाठवण्याचा निर्धार नागरिकांकडून केला जात आहे. परिसरातील ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची प्रचार यंत्रणा भक्कम
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील घटक पक्ष, संघटना यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीने आपण सामोरे जात आहोत. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाची लोकसभा निवडणूक विजयासाठी भूमिका निर्णायक ठरणार आहे. प्रचाराचे योग्य नियोजन व सर्व पक्ष, संघटना यांच्यात समन्वय साधून संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करण्याचा निश्चय उपस्थित पदाधिका-यांनी केला.



