प्रवेशानंतर बोलताना अर्चना चाकूरकर म्हणाल्या की, ”गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विकास कामं केली आहेत. त्यांच्या विकासकामांमुळं देशाच्या प्रगतीला वेग आला आहे. पंतप्रधानांनी महिलांसाठी नारी शक्ती वंदन विधेयकही मंजूर केलं आहे. त्यामुळं ज्या महिला राजकारणात येण्यास घाबरत होत्या, त्या आता राजकारणात उतरत आहेत. त्याचप्रमाणं मी सोनिया गांधी, सुषमा स्वराज यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना जवळून पाहिलं आहे. त्यांचं कामही मी पाहिलं आहे. त्यांचाही माझ्यावर खूप प्रभाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यानं प्रभावित होऊन मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडवणीस म्हणाले की, ”काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील देशातील राजकारणात नावाजलेलं नाव आहे. त्यांनी नेहमीच मूल्याधारित राजकारण केलं आहे. त्यांनी नेहमीच कर्तव्यदक्ष राहून खूप चांगलं काम केलं आहे. समाजासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या सून डॉ.अर्चना चाकूरकर या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, त्या सामाजिक कार्यात व्यस्त होत्या. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामानं प्रभावित होऊन अखेर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. खरंतर 2019 च्या निवडणुकीत त्या पक्षात येतील अशी आमची अपेक्षा होती. त्यांच्या येण्यानं आम्हाला खूप आनंद झाला आहे.
काँग्रेससाठी झटका
लातूर जिल्ह्यात चाकूरकर कुटुंबीयांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र आणि राज्याचे माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनी यापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला असून आता अर्चना चाकूरकर यांच्या प्रवेशामुळं मराठवाड्यात भाजपाची ताकद वाढण्यास मदत होणार असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.



