पिंपरी: महापालिकेने महावितरणचे (PCMC) एक कोटी 11 लाख रुपये थकविले आहेत. दुसरीकडे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकी असल्यास घर जप्त, नळजाेड खंडीत करणा-या महापालिकेनेच महावितरणचे 1 काेटी थकविले आहेत.
महापालिकेच्या वेगवेगळ्या 840 कार्यालयांकडे महावितरणचे जवळपास एक कोटी 110 लाख रुपये थकबाकी आहेत. स्वतः महावितरणकडे मोठी थकबाकी ठेवून शहरातील नागरिकांकडे मालमत्ता कर थकबाकीचे पैसे वसूल करत असल्याने महापालिकेच्या कारभारावर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाचे सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले म्हणाले, महावितरणच्या थकबाकीचे विवरण करून बिले अदा केली आहेत. आता महापालिकेकडे एवढी थकबाकी नाही.




