पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – गांधीनगर, खराळवाडी येथील रहिवासी असलेले आणि प्रसार माध्यमांमध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम करणारे भानुदास भगवान गायकवाड (वय 47) यांचे शुक्रवारी (दि.5) उपचारादरम्यान पिंपरीतील एका रुग्णालयात निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन बहिणी, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. गायकवाड हे तात्या या टोपण नावाने प्रसिद्ध होते. तात्यांचा स्वभाव सर्व पत्रकारांच्या मध्ये माहित असल्यामुळे ते सर्व दैनिकांच्या व सोशल मीडिया प्रसिद्धी माध्यमांच्या संपर्कात होते. नेहमी हसतमुख असणारे तात्या अल्पवयात सोडून गेल्याने सर्व पत्रकार हळूहळू व्यक्त करीत आहेत.




