पिंपरी-चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या स्पा सेंटरचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने पर्दाफाश केला आहे. उच्चभ्रू असलेल्या पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात स्पा सेंटर सुरू होते. वेश्याव्यवसाच्या जाळ्यातून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

अक्षय धनराज पाटील (स्पा मॅनेजर), रोहन समुद्र (स्पा मालक) आणि भूषण पाटील (स्पा मालक) यांचा वाकड पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम ३७० (३),३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.