
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काही वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर त्यांनी कॅमेरासमोर येत मतदान केल्याची खूण म्हणजेच शाई लावलेलंं बोट दाखवलं. तसंच आपण मतदानाचा हक्क बजावला त्याप्रमाणे नागरिकांनीही बजावला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज, शनिवारी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दिल्लीतील सर्व सात आणि हरियाणातील सर्व दहा जागांवर मतदान होणार असून सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे.




