
पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा मुलगा विशाल अग्रवाल हा देखील पोलीस कोठडीत आहे, तर अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात आहे. सर्वात प्रथम वडील, मग नातू आणि आता आजोबा असे तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधींना अटक केली आहे. ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणी टीकेची झोड उडाल्यानंतर पुणे पोलीस सध्या ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. या प्रकरणात मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालने गुरुवारी (23 मे) चौकशी करण्यात आली. या चौकशीत लाडोबाला आजोबांनी चावी दिल्याची कबुली चौकशीत दिली होती. तसेच नातू अल्पवयीन असल्यााचा देखील दावा आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी केला होता. नातवावर खटला अल्पवयीन म्हणूनच चालवावा, अशी मागणी सुरेंद्र अग्रवाल यांनी केली होती.




