पिंपरी : सांगवी पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरातील हॉटेल अँड बार मालक व चालक यांची गुरुवारी सायंकाळी बैठक पार पडली. सदर बैठकीचे आयोजन सांगवी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले होते. बैठकीदरम्यान सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे उपस्थित होते.
या वेळी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या भागातील हॉटेल, बार मालक, चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकी दरम्यान सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना सूचना व मार्गदर्शन केले. हॉटेलमध्ये घेण्यात येणार्या कार्यक्रमाची कायदेशीर परवानगी घेणे बंधनकारक आहे. वय २१ वर्षे पूर्ण नसलेल्या मुला-मुलींना मद्य देण्यात येऊ नये. तसेच मद्यपिण्याचे लायसन असणार्यांनाच हॉटेलमध्ये मद्य देण्यात यावे. अल्पवयीन मुला-मुलींना मद्य देण्यात येऊ नये. हॉटेलमध्ये व पार्किंग परिसरात चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.
गुन्हेगारांना प्रवेश देऊ नये. महिला बाउन्सर ठेवण्यात याव्यात. हॉटेलमध्ये येणार्या जाणार्या ग्राहकांच्या रजिस्टरमध्ये नोंदी ठेवण्यात यावी. भांडणाचा प्रकार होणार नाही तसेच महिलांची व मुलींची छेडछाड होणार नाही याकडे लक्ष केंद्रित करावे. शासनाने दिलेल्या वेळेनुसार आपली आस्थापना चालू ठेवावी. विहित वेळेपेक्षा जास्त वेळ आस्थापना चालू ठेवू नये. शासनाने निर्गमित केलेल्या सर्व अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे. राज्य उत्पादन विभाग व इतर विभागाच्या शासकीय परवानग्या घेऊनच आपली आस्थापना चालू ठेवावी. शासनाच्या नियमांचे पालन करूनच आपण आपले आस्थापना चालू ठेवण्यात यावे. लपून छपून कोणीही आस्थापना चालवण्याचा प्रयत्न करू नये. आदींबाबत स्पष्ट सूचना देत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हॉटेल, बारमालक, चालक यांचे देखील प्रश्न समजून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
![](https://ejanashakti.com/wp-content/uploads/2023/03/Screenshot_20240711_092011_Facebook.jpg)