पिंपरी : हत्या आणि घरफोडी करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवडच्या निगडी पोलिसांनी पुण्याच्या हडपसर येथून अटक केली आहे. आरोपी विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी याच्यावर खुनाचा प्रयत्न, खून, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी असे ९० गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडणं अत्यंत आव्हानात्मक होतं. निगडी येथील ज्वेलरी शॉप फोडल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा शोध निगडी पोलीस घेत होते. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.