- अजित पवार यांचे विश्वासू व एकनिष्ठ म्हणून नाना काटे यांचे नाव आघाडीवर
पिंपरी : लोकसभा निवडणुकीवर आता विधानसभा निवडणुकीच्या चर्चाना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीत शहरातील नागरिकांनी विशेषत: चिंचवड विधानसभेतील मतदारांनी महायुतीच्या पदरात भरभरून मतदान केल्यामुळे आता इच्छुकांचे गर्दी वाढत आहे. शहरात सर्वाधिक चर्चेत असणारा चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून मतदार संघ आपल्याला मिळण्यासाठी रस्सीखेच होणार आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळाल्यास पुन्हा अजित पवार यांचे विश्वासू व पक्षाची एकनिष्ठ असणारे नाना काटे प्रबळ दावेदार ठरणार आहेत.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक इच्छुक असल्याने पोटनिवडणूक कोण लढवणार? याचा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवण्यात आला होता. त्यानंतर पक्षाकडून सर्व्हे केल्यानंतर जनसामान्यात व विशेषत : तरुण वर्गात क्रेज असणारे आणि अजित पवार यांचे खंदे समर्थक एकनिष्ठ म्हणून उमेदवारीची माळ माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या गळ्यात पडली. अगदी कमी वेळात नाना काटे यांनी लक्षवेधी लढत देत ९९ हजार ४५५ मतदानापर्यंत मतदान घेतले. अगदी कमी वेळेत सर्व मतदारापर्यंत नाना काटे पोहचले.
तिरंगी लढतीमुळे नाना काटे यांचा निसटता पराभव झाला. मात्र, पराभवाने न खचता नाना काटे पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. पक्ष संघटनेसाठी अधिकाधिक वेळ देत आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी दैनंदिन सुसंवाद, सामान्यांचे प्रश्न सोडवणे, सुखदुःखाच्या समयी गाठीभेटी, तरुणाईचे प्रश्न सोडवणे, विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आपला दैनंदिन कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली यानंतर अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ राहत त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. यामुळेच चिंचवड विधानसभेवर नाना काटे यांची प्रबळ दावेदारी राहणार आहे हे दिसून येत आहे.
लढवय्या नेता.. कणखर बाणा..
आपला माणूस… आपला नाना…
चिंचवड विधानसभा मतदारसंघावर मागील अनेक वर्षापासून जगताप कुटुंबियांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र लक्ष्मणभाऊ यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभेसाठी नवीन लोकप्रतिनिधी चेहरा हवा अशीच मतदार संघातील नागरिकांची इच्छा आहे का? असा प्रश्न मतदानाची आकडेवारी समोर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून व मागील वीस वर्षे पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात सक्रिय असणारे नाना काटे यांचे कुटुंब अविरहित काम करत आहे. सामान्य लोकांशी नाळ, काम करण्याची तत्परता, युवकांशी असणारे नाते, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, बांधकाम सर्व स्तरातील क्षेत्रात समन्वय ठेवून जनतेचे विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून नाना काटे यांच्याकडे पाहिले जाते. लोकांच्या प्रश्नासाठी लढणारा लढवय्या नेता म्हणून नाना काटे संपूर्ण शहराला परिचित आहेत. पोटनिवडणुकीत जवळपास एक लाखाचे मतदान घेऊन विजयाच्या समीप असणारे नाना काटे आगामी विधानसभा निवडणुकीत विजयी मार्गावर अश्वारूढ झाले तर नवल नको…… कारण चिंचवड मधील तमाम मतदारांना लढवय्या नेता.. कणखर बाणा..आपला माणूस… आपला नाना… म्हणून नाना काटे आवडतात.
![](https://ejanashakti.com/wp-content/uploads/2023/03/Screenshot_20240711_092011_Facebook.jpg)