
पिंपरी : पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सेक्रेटरी व फ्रीलान्स पत्रकारिता करणारे भोसरी येथील संजय बोरा यांचे आज सकाळी निधन झाले आहे.
बोरा यांना आज सकाळी छातीमध्ये दुखत असल्याने सुरुवातीस आनंद हॉस्पिटल येथे ऍडमिट केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे ycm रुग्णालयातील डॉक्टरनी घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
