🔰 चिंचवड विधानसभेसाठी मतदारांच्या मनी पुन्हा विठ्ठल…विठ्ठल
पिंपरी : लोकसभा निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील सर्वाधिक महत्त्वाचा मतदारसंघ असणाऱ्या चिंचवड मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्यामुळे इच्छुकांची रस्सीखेच सुरू झाली आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत आमदार अश्विनी जगताप 38 हजार मताधिक्याने विजयी झाल्या. त्यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी लक्षवेधी लढत देत ९९ हजार ४५५ मतदान घेतले. अगदी कमी वेळेत सर्व मतदारापर्यंत आणि विशेषतः युवा वर्गापर्यंत नाना काटे पोहचले. आता हे दोन्हीही नेते महायुतीत असल्याने आगामी चिंचवड निवडणूकीसाठी पुन्हा खेला होबे (खेल चालू है) सुरू झाला आहे.
राज्यात महायुती सरकारमध्ये भाजप शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने समर्थन देत सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणाची दिशा बदलताना दिसत आहे. चिंचवड भाजपसाठी बालेकिल्ला समजला जातो. एकीकडे भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी जगताप कुटुंबीयात वाद सुरू असताना माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी उघडपणे पक्षश्रेष्ठीने मला पोटनिवडणुकीवेळी शब्द दिला असे सांगून भाजपमधील अंतर्गत वाद समोर आणला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांचे विश्वासू व पक्षाची एकनिष्ठ असणारे आणि “राजा का बेटा राजा नही बनेगा… राजा वही बनेगा जो काबिल होगा” हा हुंकार भरत उदयनमुख नेतृत्व तयार झालेले पिंपळे सौदागर रोल मॉडेल चे शिल्पकार माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी विधानसभा निवडणूक पुन्हा लढणारच असा ठामपणे निर्धार व्यक्त केल्याने खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापले आहे.
युवकांच्यात क्रेझ असणाऱ्या नाना काटे साठी “आपला नाना” विठ्ठलाचा गजर….
पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीमुळे विजयाच्या जवळ असताना नाना काटे यांचा पराभव झाला. तरीही, पराभवाने न खचता नाना काटे पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. पक्ष संघटना बळकट करताना विशेषतः युवक वर्गाची संघटनात्मक बांधणी मजबूत केली. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकास कामे, नागरिकांच्या समस्या, नागरिकांच्या सुखदुःखाच्या समयी गाठीभेटी, तरुणाईचे प्रश्न सोडवणे, विविध कार्यक्रमांना हजेरी, २४ बाय ७ उपलब्ध राहत आपला दैनंदिन कार्यक्रम सुरूच ठेवला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने आयटी मतदार वर्ग आहे. तसेच युवकांची मतदार संख्या ही सर्वाधिक आहे. विशेषत: युवा वर्गात नाना काटे यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्यासाठी विशेष मोहीम सुरू झाली आहे. युवा वर्गाने “आपला नाना.. आपला विठ्ठल” या नावाचा जयघोष पुन्हा सुरू करत आमचा आमदार… आमचा विठ्ठ… असा निर्धार करताना विधानसभेत अबकी बार नाना काटे आमदार यांच्या रूपाने युवा आमदार पाठवण्याचा निर्धार केला आहे.




