नसेल बंधन परिस्थितीचं..
उभ आकाश तुमच्या उज्ज्वल भविष्याचे..
निगडी: रुपीनगर तळवडे येथे एक आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्रात प्रायमरी शिक्षणाचा महोत्सव हा पहिला उपक्रम रुपीनगर येथे पार पडला. गेली १ महिन्यापासून सुरू असलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन व लकी ड्रॉ भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. सौ. शितलताई धनंजय वर्णेकर यांच्या माध्यमातून रुपीनगर, तळवडे, सहयोग नगर, परिसरातील 280 मुलांना प्री-प्रायमरी शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. 600 पेक्षा जास्त पालकांनी यासाठी अर्ज सादर केले होते व त्यातील लकी ड्रॉ मध्ये 280 मुलांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येणार आहे.
केंब्रिज इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या उद्घाटन प्रसंगी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, केंब्रिज शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे व परिवाराची प्रगती व्हावी हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असतं. परंतु सर्वसामान्य पालकांना शिक्षण घेणे शक्य नसते याचा विचार करून यावर्षी 280 मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व त्याचबरोबर सर्वांगीण विकास केला जाईल असे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. धनंजय वर्णेकर यांनी म्हटले आहे
सौ व श्री वर्णेकर हे या भागामध्ये नेहमीच सामान्य लोकांच्या हिताचे कार्य करत असतात. नेहमीच सगळे वेगवेगळे उपक्रम राबवतात. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच लहान मुले या सर्वांसाठी नेहमीच उपक्रम राबवत असतात. शिक्षणा शिवाय प्रगती नाही. आज सर्वसामान्य पालकांना उत्तम शिक्षण घेणे अवघड आहे पण सौ. शितलताई वर्णेकर यांनी माझ्या भागातील मुलांची जबाबदारी माझी आहे व हे शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचे कार्य फार मोठे हाती घेतले आहे.
प्री प्रायमरी संपूर्ण शिक्षण मोफत असणारा महाराष्ट्रातील हा एकमेव प्रकल्प आहे. सामाजिक, शैक्षणिक असे अनेक उपक्रम वर्णेकर परिवार नेहमीच राबवत असतो. असे गौरवोद्गार आमदार महेश लांडगे यांनी काढले.
याप्रसंगी कार्तिक लांडगे, मा. नगरसेवक शांताराम भालेकर, सुलभा बोडके, अस्मिता भालेकर, वैशाली भालेकर, संगीता गोडसे, शितल पारखी, सुमन काकडे तसेच पालक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले.




