भोसरी : संत निरंकारी मिशन मार्फत ‘आंतर्राष्ट्रीय योग दिवस’ निमित्ताने शुक्रवार, दि. २१ जून २०२४ रोजी संपूर्ण भारतवर्षातील संत निरंकारी मिशनच्या विविध शाखांमध्ये सकाळी ६:०० वाजल्यापासून स्थानिक योग प्रशिक्षकांच्या निर्देशनाखाली खुल्या प्रांगणांत तसेच उद्यानांमध्ये योग दिवसाचे उत्साहपूर्वक आयोजन करण्यात येणार आहे. भोसरी येथील संत निरंकारी सत्संग भवन,दिघी येथे विशाल योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे
संयुक्त राष्ट्र संघाकडून या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा विषय ‘महिला सशक्तिकरणासाठी योग’ असा देण्यात आला आहे जी आज काळाची गरज आहे यात तिळमात्र शंका नाही. संत निरंकारी मिशन देखील वेळोवेळी महिला सशक्तिकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने प्रयासरत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिलाई व एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण केंद्र, ब्यूटीशियन कोर्स, टयूशन सेंटर इत्यादींचा समावेश आहे.
संत निरंकारी मंडळाचे समाज कल्याण प्रभारी आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजा यांनी माहिती दिली की, सन २०१५ पासूनच संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत ‘योग दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेमध्ये यावर्षीदेखील ‘आंतर्राष्ट्रीय योग दिवस’ कार्यक्रमाचे विशाल रूपात आयोजन संपूर्ण भारतवर्षातील जवळपास सर्व भागांमध्ये मोठ्या उत्साहाने केले जाणार आहे.




