तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरात गुरुवारी (दि. 20) चार ठिकाणी हवेत गोळीबाराची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र चार ठिकाणी घडलेल्या गोळीबारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात चार ते पाच जणांचे टोळके हातात पिस्तूल घेऊन फिरत होते. शहरात फिरत असताना टोळक्याने गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. या टोळक्याने चार ठिकाणी गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळाली नाही.




