
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगेंचं आंदोलन सुरुच आहे. सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे ही त्यांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरु केलं आहे. त्यांना उद्देशूनही मनोज जरांगेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
आंतरवली सराटीमध्ये आमचं आंदोलन सुरु आहे. मी रुग्णालयातून चाकरवाडीला जाणार आहे आणि पुन्हा रुग्णालयात येणार आहे. मला इथून कुणीही जायला सांगितलेलं नाही. तसंच मी अशा गोष्टी ऐकतही नसतो.” असं जरांगे म्हणाले. तसंच लक्ष्मण हाकेंना उद्देशूनही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं.



