पुणे : पुण्यातील प्रसिद्ध शंकर महाराज मठात भाजपच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. पण भाजपने अशा प्रकारे कसलीच मारहाण झाली नसल्याचे म्हंटले आहे. पुण्यातील सातारा रोडवरील धनकवडी याठिकाणी हा शंकर महाराज मठ आहे.
राज्यभरातून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. या मठात भाजपच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. यामुळं इथंल्या भाविकांमध्ये नाराजी असल्याची माहिती मिळतेय. तसेच या प्रकाराकडे मठ प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचा भाविकांचा आरोप आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या मठात येऊन एकमेकांविरोधात अशा प्रकारे राडेबाजी करणे योग्य नसल्याचे भाविकांनी म्हंटले आहे.




