हिंजवडी : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील बारमध्ये काही तरुण अमली पदार्थ घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला. तसेच हा बार मर्यादित वेळेपेक्षा उशिरापर्यंत सुरू असल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, आणि पीएमआरडीए यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
पुणे महापालिकेने 92 बारची यादी पीएमआरडीएकडे दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरात बार बाबतच्या नियमांचे पालन होत असल्याचे निदर्शनास आले असले तरी शहरालगत असलेल्या हिंजवडी परिसरात पीएमआरडीएने मोठी कारवाई केली आहे.
मुळशी तालुक्यातील 22 बार मध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत पीएमआरडीएने जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाकडे माहिती पाठवली. त्यानंतर पीएमआरडीएने हिंजवडी मधील आठ बार वर कारवाई केली.
हिंजवडी मधील फवेला गॅस्ट्रोस काय बार, रियो किचन अँड बार, मरीन ड्राईव्ह रेस्टो अँड स्काय बार, धीम्स किचन अँड कॅबरेट, हूश कॅफे अँड बार, हॅप्पी दा पंजाब बार अँड रेस्टॉरंट, बिलेनिअर्स हब, द कम्युनिटी टेबल या आठ बार वर कारवाई करण्यात आली आहे. तर भुगाव आणि भुकूम मधील बारा आस्थापनांवर कारवाई झाली आहे.




