पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तीन वर्षापासून अनेक अधिकारी व स्थायी समितीमधील पदाधिकारी यांच्यावर लाच लचपत विभागाने कारवाई केली. मात्र यातूनही काही धडा नाही घेता त्यांचे जुनिअर लिपिक त्यापुढील कारनामा करताना दिसत आहेत.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागातून शहरात विविध उद्योग व्यवसायांना परवाने आणि ‘ना हरकत’ प्रमाण देण्यात येतात. या परवाने आणि ‘ना हरकत’ प्रमाणपत्रावर एका महिला लिपिकाने विभाग प्रमुख असलेल्या उपायुक्तांच्या बनावट सह्या मारून आर्थिक अपहार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
– संदीप खोत, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका
महिला लिपिकाने उपायुक्तांच्या बनावट सह्या करून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले आहेत. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. यापूर्वी त्या महिलेने आणखी किती उद्योग व व्यवसाय परवाने दिले आहेत का? त्यांनी आणखी कोणाच्या सह्या केलेल्या आहेत का? याविषयी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यानुसार संबंधित महिला लिपिकाचे सेवानिलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे ठेवला आहे. आयुक्त शेखर सिंह हे सुट्टीवर आहेत. त्यामुळे ते आल्यानंतर त्या महिला लिपिकावर कारवाई केली जाईल, त्यानंतर विभागीय चौकशी देखील करण्यात येणार आहे.
– विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, महापालिका




