
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशांसाठीची पहिली गुणवत्ता यादी आज (२७ जून) जाहीर झाली आहे. यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एक जुलैपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार असून, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य आहे. आतापर्यंत कोटा प्रवेशाअंतर्गत ३ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेश क्षेत्र – मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच नागपूर, अमरावती आणि नाशिक महानगरपालिकांच्या क्षेत्रांचा समावेश आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज, २७ जून २०२४ रोजी जाहीर झाली आहे. अकरावी प्रवेशासाठी तीन लाख 99 हजार 235 जागा उपलब्ध आहेत. या जगासाठी दोन लाख 38 हजार 934 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. तर तब्बल एक लाख 60 हजार 303 विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया कडे पाठ दाखवली आहे. सर्वसाधारण यादीत कला शाखेकडे सर्वात कमी कल दिसून आला आहे. तर वाणिज्य व विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल दिसून येत आहे.




