पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट -2 च्या पथकाने एकाला अटक केले असून त्याच्याकडून 2 पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख 2 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.25) चिंचवड गावात करण्यात आली.
दुर्गेश बापु शिंदे (वय-37 रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार जयवंत जगन्नाथ राऊत यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीवर महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.




