मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर 28 जून रोजी दुपारी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून एका कारने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.
मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुंबईकडे कंटेनर क्रमांक (MH 46-BM 1535) हा माल घेऊन जात असताना तो बोरघाटात आला असता पाठीमागून येणाऱ्या वागेनर कार क्रमांक (MH 43 BE 8562) ने समोरील कंटेनर ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. तर कंटेनर ने समोरील तिसऱ्या अज्ञात वाहनाला धडक देऊन तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात कार मधील 4 जणांपैकी 2 जणांना दुखापत झाली असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटलची टीम, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दोन व्यक्तींचे मृतदेह खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले




