
पिंपरी : पती-पत्नीच्या किरकोळ गोष्टींमध्ये सतत ढवळाढवळ करुन साडू आणि मेहुणीने मानसिक त्रास दिला. दोघांच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 16 जून रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथील राजीव गांधी नगर येथे घडली आहे. याप्रकरणी दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तानाजी सुबराव ठोसर (वय-38 रा. राजीव गांधी नगर, पिंपळे गुरव मुळ रा. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी तानाजी यांची आई नंदा सुबराव ठोसर (वय-55 रा. कुंबेफळ ता. परांडा जि. धाराशिव) यांनी शुक्रवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मेहुणी दिपाली बाबासाहेब हावळे (वय-39) साडु बाबासाहेब प्रभु हावळे (वय-42 दोघे रा. दत्तमंदीर रोड, प्रभात कॉलनी, वाकड) यांच्यावर आयपीसी 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.




