
नवी दिल्ली : तुमच्या गाडीचे आयुष्य पूर्ण झाल्यानंतर ती भंगारात जाणार असेल तर तिचा जुना नंबर तुम्ही तुमच्या नवीन गाडीवर लावू शकणार आहोत. दिल्ली परिवहन विभाग आवश्यक पूर्ण केल्यानंतर, विहित शुल्क भरून आणि स्क्रॅपचे प्रमाणपत्र जमा केल्यानंतर तुम्हाला जुना नंबर पुन्हा अलॉट करेल. परिवहन विभागाचे म्हणणे आहे की, स्क्रॅप पॉलिसी अंतर्गत अशाप्रकारची तरतुद करण्यात आली आहे.
जुन्या वाहनाचा नंबर व्हीआयपी अथवा फॅन्सी नंबरच्या यादीत असल्यास अर्जदाराला त्याच्या मुळ किमतीच्या १० टक्के अथवा २५ हजार रुपये शुल्क जमा करावे लागेल.
स्क्रॅप पॉलिसी अंतर्गत डिझेल वाहनाचे १० वर्ष आणि पेट्रोल वाहनाचे १५ वर्षाचे आयुष्य पूर्ण झाल्यानंतर परिवहन विभाग त्यांची नोंदणी रद्द करते. यानंतर वाहन स्क्रॅप करावे लागेल. यासाठी विभागाने वेंडर ठरवून दिले आहेत. स्क्रॅप करणारा वेंडर वाहन मालकाला स्क्रॅपचे प्रमाणपत्र देतो. या आधारे परिवहन विभाग पुन्हा जुन्या नंबरचे वाटप करतो.
जुना नंबर व्हीआयपी असल्यास वाहन मालकाला जास्त शुल्क भरावे लागणार आहे. उदाहरणार्थ जर एखाद्याच्या जुन्या वाहनाचा नंबर ०००१ असेल तर हा नंबर व्हीआयपी नंबर आहे आणि त्याची बेस प्राईज पाच लाख रुपये आहे. पुन्हा हा नंबर घेण्यासाठी १० टक्के हिशोबाने ५० हजार रुपये जमा करावे लागतील.




