पिंपरी : संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील मनपा कार्यालयात जन्म मृत्यू दाखल्याची प्रत देण्याचे काम गेल्या एक महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जन्म मृत्यू दाखला काढण्यासाठी लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरिकांच्या सोबत चाललेली हेळसांड पालिका प्रशासनाने तात्काळ थांबवावी. अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.
महापालिकेच्या वतीने पूर्वी ज्या सॉफ्टवेअर मधून हे जन्म मृत्यू दाखले दिले जात होते. ते सॉफ्टवेअर बंद झाले असून त्याजागी अत्याधुनिक नवीन सॉफ्टवेअर १५ दिवसापूर्वी घेण्यात आले आहे. परंतु ते सॉफ्टवेअर आजच्या तारखेपर्यंत बंद का आहे. कशासाठी कुणाच्या फायद्यासाठी ? तसेच हे सॉफ्टवेअर हाताळायचे कसे, त्यात काम कसे करावे याचे ट्रेनिगं देखील संबंधित कर्मचारी वर्ग यांना अध्याप दिले गेलेले नाही.
अशा कारणांमुळे नागरिकांना काही खासगी शासकीय, शैक्षणिक, कामासाठी लागणारे दाखले मिळत नसून नागरिक रोज आपल्या कार्यालयात हेलपाटे मारीत आहे. पालिकेच्या कर्मचारी यांना सॉफ्टवेअर चालू झाले नाही. यामुळे दाखले देणे बंद आहे, उद्या या, परवा या, असे उत्तर देत आहेत. विविध शासकीय योजना चालू झाल्या आहेत तसेच शैक्षणिक प्रवेशाचे दिवस चालू आहे. त्यासाठी नागरिकांना जन्म मृत्यू दाखला प्रत महत्वाची असते. नागरिकांना मागील महिनाभरापासून जन्ममृत्यूचे दाखले मिळत नाहीत हि खूप गंभीर बाब असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे
त्यामुळे महापालिकेच्या जन्म मृत्यू दाखल्याबाबत शहरात चालू असलेल्या नागरिकांची गैरसोय हेळसांड पाहता आयुक्तांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून त्वरित नागरिकांना जन्म मृत्यू दाखले कसे मिळतील याचे प्रयोजन करावे. तसेच शहरातील नागरिकांना होणार्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.




