
पुण्यातल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण देखील तसंच आहे. पूजा खेडकरची पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर आता वाशिमची जिल्हाधिकारी असणार आहेत. स्वतंत्र केबिन आणि कर्मचारी अशा मागण्यांवरून वाद निर्माण केल्यानंतर पुण्यात तैनात असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याची प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच तिची मध्य महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याची मागणी
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अधिकृत पत्रात म्हटले आहे की 2023 बॅचच्या IAS अधिकारी पूजा खेडकरची तिच्या प्रशिक्षणाचा उर्वरित कालावधी पूर्ण करण्यासाठी वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. ती 30 जुलै 2025 पर्यंत तेथे सुपरन्युमररी असिस्टंट कलेक्टर म्हणून काम करेल.
पूजा खेडकरने चमकेगिरी केल्याने तिची बदली करण्यात आली आहे. व्हिआयपी नंबरप्लेट असलेल्या ऑडी कारला लाल आणि निळा दिवा लावणं, पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच निवासी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्स अॅप मेसेज करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, कार, निवासस्थान आणि शिपाई या संबंधीची मागणी तिने केली. त्यानंतर प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून याबाबत विचारणा करत असल्याकारणाने तिची आता वाशिमला बदली करण्यात आली आहे.
त्याचबरोबर असा दावा देखील करण्यात आला आहे की, पूजाने तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबरवरही कब्जा केला होता. तिथे तिने तिच्या नावाचा बोर्ड देखील लावली होता. पूजाच्या या वागणुकीबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित IAS पूजा खेडकर हिची तक्रार केली होती. ज्यामुळे आता तिची थेट वाशिमला बदली करण्यात आली आहे.




