file photoमुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरु झालेली आहे. याबाबत दौरे, भेटी, बैठका वाढल्याचे चित्र आहे. असे असतानाच राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. मी शिंदे सरकारवर नाराज नाही पण या सरकारने शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही तर आम्हाला राज्यामध्ये तिसरी आघाडी उघडावी लागेल असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे. बच्चू कडू हे सध्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी आहेत.
बच्चू कडू म्हणाले, “मी सरकारवर नाराज नाही. पण जर सरकारने शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. तर आम्हाला राज्यामध्ये तिसरी आघाडी उघडावी लागेल. तिसऱ्या आघाडीद्वारे आम्ही १५ ते १७ जागा या विधानसभेला लढवू आणि त्या जिंकू देखील, असा आम्हाला विश्वास आहे. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत, जे अद्यापही मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी तसा निर्णय घ्यावा लागेल असे बच्चू कडू यांनी सांगितले.



